शिवसेनेच्या शिक्षक सेनेतर्फे बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा

0
343

चंद्रपूर/प्रतिनिधी

शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने रामाला तलावाच्या रक्षणार्थ इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. शिक्षक सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यांवर चर्चा केली.
मागील काही वर्षांपासून इको प्रो संस्था आणि पर्यावरण प्रेमी बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पर्यावरण आणि स्वच्छतेला घेऊन अनेक यशस्वी आंदोलने करण्यात आली. ज्यामुळे समाज आणि प्रशासनाला मोठा हातभार लागला. वन्यजीव, पर्यावरण आणि स्वच्छतेप्रति जागरूकता निर्माण केली. मागील दोन वर्षांपूर्वीच चंद्रपूरचा गोंडकालीन किल्ला सलग 900 दिवस स्वच्छ करून देशामध्ये आदर्श निर्माण केलेला आहे, ही चंद्रपूरसाठी गौरवाची बाब असल्याचे राजेश नायङू यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. मागील दहा दिवसांपासून आणि बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात रामाळा तलाव खोलीकरण स्वच्छता आणि संवर्धनाच्या मागणीसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. प्रकृती ढासळल्यानंतरही उपचारानंतर धोत्रे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला प्रारंभ केलेला आहे. या आंदोलनाची दखल घेऊन शिवसेनेचे नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी उचित कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना निर्देश दिलेले आहेत. आदित्य साहेब ठाकरे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शिवसेनाप्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. इतर विभागाकडे असलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी शिक्षक सेना तन-मन-धनाने इकोप्रो सोबत असल्याचे जाहीर समर्थन जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी आपल्या पत्रकातून दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here