सावधान! गोंदिया जिल्ह्यातील नागमणी, बनावटी अफवा

0
372

सध्या सोशल मीडियावर वायरल होत असलेली नागा चा नागमणी ही गोंदिया जिल्ह्यातील बातमी मोठ्या प्रमाणात वायरल होत असून यामुळे समाजात खोटी अंधश्रद्धा व नागमणी बाबतची अफवा व सापाच्या नाग प्रजातीसाठी भविष्यात धोका निर्माण करणारी असून प्रसिद्धीच्या हव्यासापाई स्वतःला सर्पमित्र म्हनवणारा शैलेश बोरकर व त्याचा मित्र योगी धामडे हे गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत रतनाला या गावात घडलेल्या तथाकथित सापाच्या नागमणी यासंदर्भात बनावटी फोटो सोशल मीडियावर व वृत्तपत्रात देऊन त्याबद्दलची खोटी बनावटी स्टेटमेंट पत्रकारांना देऊन  एका हिंदी वृत्तपतत्रात त्यांनी नागमणी बाबतची एक मोठी बातमी प्रसिद्ध केली व ती इकडे तिकडे वायरल झाली.
ह्या बातमी संदर्भात वास्तविक तथ्य व खोटारडेपणा यातील तफावत समोरील प्रमाणे आहे स्वतः तथा कथित सर्पमित्र असलेला शैलेश बोरकर आणि योगी धामडे यांनी दिलेल्या स्टेटमेंट नुसार त्यांनी रात्री 10.30 वाजता आलेल्या काल वरून पूर्ण विकसित नाग साप पकडला आणि त्यांनी त्या पूर्ण विकसित नाग सापाचे वजन दहा ते अकरा किलो असल्याचा वर्तमानपत्रात दावा केला मात्र, ही सरासर त्यांची खोटी आणि बनावटी माहिती आहे. यात स्वतःला  सर्पमित्र बनवणारा शैलेश बोरकर यांनी प्रसिद्धीसाठी हे जरी केले असले तरी तो सर्पमित्र असल्यास त्याला या गोष्टीची माहिती असायला पाहिजे की किंग कोब्रा सारख्या जगातील सर्वात मोठ्या विषारी नाग सापाचे वजन सुद्धा जास्तीत जास्त दहा (10 ) किलो असते किंवा एका  किलो 9 ते 10 फूट लांबीच्या अजगराचे सुद्धा वजन (11 ) किलो राहत नाही तर यांना कोणत्या ग्रहा वरून आलेला दहा अकरा (10-11) किलो वजनाचा नाग साप मिळाला . आणि त्यांनी कोठे मोजला हे त्यांनाच माहीत.
दुसरी म्हणजे त्यांनी जेव्हा नाग सापाला जंगलात सोडले त्यावेळेस त्याने एक प्रकाशमान असा नागमणी तोंडाद्वारे बाहेर काढला ज्याचा प्रखर प्रकाश हा शंभर व्हाट बल इतका असल्याचा त्यांनी सांगितले व 5-7  मिनिटानंतर तो नागमणी स्वतः घेऊन साप निघून गेल्याचे त्यांनी सांगितले परंतु शंभर व्हाट बल एवढा उजेड असलेला नागमणी जर नागाच्या पोटात जरी ठेवला तरी त्याच्या स्केल्स मधून त्याचा प्रकाश मात्र बाहेर जाणवेल हे नक्की आणि हे सर्व कृत्य म्हणजे नाटक पाच – सात मिनिटे चालल्यानंतरही दोघांकडे सुद्धा दोन चांगले मोबाईल असतानाही त्यांनी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ न करणे हे प्रश्नार्थकच आहे . तर त्यांनी दिलेल्या फोटो मध्ये दाखविलेले उजेड हे टार्च मारून फोटो काढल्यानंतर ही उजेड बनतात त्या पद्धतीची असून एका फोटोवर तर एडिट करून डोक्यावर मनी ठेवून त्याचा उजेड दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे . जो कोणीही हातांना पकडल्याशिवाय नागाच्या फण्यावर ठेवू शकणार नाही तर नागाने स्वतः डोक्याच्या फण्यावर तो नागमणी कसा ठेवला आणि त्याचाच दुसरा फोटो एडिट न केलेला ज्यात नागमणी नाही आहे हे. सुद्धा त्या दोन फोटोमध्ये निदर्शनास येते.
त्यामुळे असे एडिट केलेले फोटोज त्यांच्याकडे कोणताही व्हिडिओ प्रमाण म्हणून नसताना वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर देऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जे काही समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणारी व  सापाच्या नाग प्रजातीसाठी भविष्यात संकट निर्माण करणारी बातमी त्यांनी वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर प्रकाशित केली यामधून त्यांनी समाजात खूप मोठी अंधश्रद्धा पसरण्याचा काम केला आहे.  त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायदा 2013 अंतर्गत कलम (2 घ) नुसार प्रचार करणे कोणत्याही खोट्या गोष्टीचा अंधश्रद्धा पसरवणारा प्रकार , प्रकाराचा प्रचार करणे वर्तमानपत्रात त्याबद्दलची प्रसिद्धी करणे,  व समाजात अंधश्रद्धा पसरवणे हा गुन्हा असून या कलम दोन घ नुसार त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
“सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेली  गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रतनारा या गावातील तो त्या सर्पमित्र शैलेश बोरकर व योगी धामणे यांनी पसरवलेली नागमणी ही बातमी एकदम बनावट व खोटी असून त्याकडे दुर्लक्ष करून त्या बातमीचे गांभीर्य समजून त्याबद्दल कोणतीही अंधश्रद्धा लोकांनी ठेवू नये. कोणत्याही सापाच्या तोंडात किंवा शरीरात नागमणी राहत नाही ते फक्त चित्रपट आणि मालिका यामध्ये दिसून येऊ शकते!” यश कायरकर सर्पमित्र तथा अध्यक्ष स्वाब नेचर केअर फाउंडेशन तथा संघटक नागभीड तालुका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here