नागभीड वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाला गेलेला वृद्धाचे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू: कोसंबी-गवळी बिटातील घटना.

0
525

यश कायरकर (तळोधी बा.): तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धाला वाघाने ठार मारल्याची घटना आज दिनांक 05 मे 2022 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत, नागभीड वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कोसंबी – गवळी बिटातील कक्ष क्रमांक 742 मध्ये तेंदुपत्ता संकलना करिता गेलेला नवेगाव हुंडेश्वरी येथील आडकू गेडाम (65) याला वाघाने ठार मारल्याची घटना आज घडली. याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक के. पाटील यांनी घटनास्थळी भेट घेऊन मौका पंचनामा करून शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.


सदर प्रकणातील पिढीत परिवाराला वन विभागा मार्फत तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक के. आर. धोंडणे, वन परिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड ,वनरक्षक के, पाटील, क्षेत्र सहाय्यक सय्यद साहेब, देवपायली चे वनरक्षक  येडमे , इत्यादी उपस्थित होते.
घटनास्थळी कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत असून वनविभागाने त्या परिसरात गस्त सुरू केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here