अभयारण्य गाईड कर्मचारी संघ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालय समोर धरणे आंदोलन

0
349

चंद्रपूर : नेचर गाईड (पर्यटक मार्गदर्शक) वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून आपली ड्युटी प्रामाणिकपणे करतात त्यांना प्रोत्साहित करणे तर दूर त्यांच्यावर नवनवीन नियम लादून नेचर गाईड (पर्यटक मार्गदर्शक) यांना परेशान करण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे. नेचर गाईड च्या विविध विषयांच्या मागण्यांवर अभयारण्य गाईड कर्मचारी संघाच्या वतीने शिष्ट मंडळा मार्फत वारंवार पत्राद्वारे वन विभागाचा लक्षात आणून देण्यात आले आहे तरीदेखील वनविभागाचे अधिकारी हेतू परस्पर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम करीत आहे.


मागणी खालील प्रमाणे
1. सचिन गेडाम या गाईड (मार्गदर्शक) ला जुना रेकॉर्ड नुसार घेण्यात यावे.
2. केसलघाट सफारी गेट मधील सर्व गाईड व जिप्सी चालक व इतर कामगारांना त्वरित कामावर घेण्यात यावे.
3. गाईडचे ग्रेडेशन रद्द करण्यात यावे.
4. सर्व कामगारांना वेतन स्लिप देण्यात यावे व पी एफ कपात करण्यात यावे.
5. गाईड (मार्गदर्शक) यांना पूर्वीचा गणवेश देण्यात यावे.
6. सर्व गाईड्स कामगारांना समान वेतन देण्यात यावे तसेच वनविभागाकडून ग्रुप इन्शुरन्स काढण्यात यावे.
7. गाईट कामगारांना बुधवार हे दिवस श्रमदान  एच्छुक असावे जबरन नाही.
8. ताडोबा पर्यटक बुकिंग वेबसाईट शासनाची असावी प्रायव्हेट नाही.
9. आजोबा वडीलाचा काळा पासून जे आदिवासी व इतर समाज जंगलात शेती करून आपला परिवाराचे उदरनिर्वाह करत आहे व वन विभागात गाईड व जिप्सी चालक व इतर काम करीत आहेत यांना जागा व काम सोडण्याचे सक्ती करण्यात येऊ नये.
10. बंद असलेला तिरकडा गेट त्वरित सुरू करण्यात यावे जेणे करून बंद असलेले गाईड्स जिप्सी चालकांना व इतर कामगारांना रोजगार मिळेल.
अशा अन्याय कारक गोष्टीसाठी अभयारण्य गाईड कर्मचारी संघ, महाराष्ट्र प्रदेश तर्फे त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संघटनेकडून एक दिवसीय धरणे आंदोलन दि. 11 मे  2022 बुधवार रोज दुपारी 12.00 ते 5.00 वाजे पर्यंत मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालय समोर करण्यात येत आहे. अशी माहिती अभयारण्य गाईड कर्मचारी संघ, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष पवन कनोजे, कोषाध्यक्ष संजय सहारे, सचिव निलेश मेंढे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here