Google search engine
Home Environment issues “स्वाब”च्या नेतृत्वाखाली सिंदेवाही येथील सर्व शासकीय कार्यालयात पक्षींसाठी घागर वितरित

“स्वाब”च्या नेतृत्वाखाली सिंदेवाही येथील सर्व शासकीय कार्यालयात पक्षींसाठी घागर वितरित

0
345

चंद्रपूर : दि.4 मे 2024 रोजी सिंदेवाही येथील पोलीस स्टेशन, वनपरिक्षेत्र कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती सिंदेवाही, ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही, या संपूर्ण शासकीय कार्यालयात ‘स्वाब नेचर केअर फाउंडेशनच्या‘ वतीने पक्षांना उन्हाळ्यात पाणी प्यायला त्यांच्या पाण्याची सोय होण्याकरिता , ‘पक्षी घागर वितरित’ करून त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने बांधून त्यामध्ये पाणी टाकण्यात आले व सोबतच या ठिकाणी रोज पाण्याची व्यवस्था करावी व जमल्यास स्वतःकडून सुद्धा काही पक्षी घागर बांधण्यात यावे असे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

पक्षी घागर वितरित’ कार्यक्रमाचे मुख्य उद्देश्य म्हणजे पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी प्यायला मदत करणे. ज्या स्थानी पक्ष्यांचा घागर (वाटण) उपलब्ध नसतो त्या स्थळावर पक्ष्यांना पाणी प्यायला देण्यासाठी ही विशेष सुविधा प्रदान करणे व तसेच पक्षी घागर करिता पाण्याची व्यवस्था करण्याचे उपाय सुचविण्यात आले , ज्यामुळे पक्ष्यांना आवडत असलेल्या स्थळावर रोजच्या उन्हाळ्यात पाणी मिळेल व त्या सुंदर पक्ष्या विषयी आवडत निर्माण होईल.


यावेळी प्रत्येक कार्यालयांमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व सर्वांनी “स्वाब” च्या कार्याचे कौतुक करत त्यांची सराहना केली. व आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यास सहकार्य करू अशी हमी दिली.
यावेळी स्वाब नेचर केअर फाउंडेशनचे नितीन भेंडाळे ,अमन करकाडे, गोपाल कुमले, छत्रपती रामटेके व यश कायरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here