रानडुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

0
453

(यश कायरकर) जिल्हा प्रतिनिधी:
तळोधी बा.
सोनूली (बुज) गट क्रमांक १२२, या शेतशिवारामध्ये खत टाकण्याचे काम करीत असताना रानडुकराने अचानक येऊन शेतकऱ्यांवर हल्ला केला. सदर घटनेत जख्मीचे नाव सचिन भास्कर मदनकर वय ३६ वर्ष व कृष्णा गणपत बोळणे वय ३१ वर्ष असे असून ते तळोधी (बा.) येथील रहिवासी आहेत. जखमी इसमाच्या  हाताला व पायावर जखमा आहेत व त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.


सदर घटनेची माहिती वनविभाग तळोधी  येथे देण्यात आली असून  वन कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळ गाठून मौका पंचनामा केला.
वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाली कडणोर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड, व वनरक्षक श्रीरामे यांनी मौका पंचनामा केला.


तळोदी बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आला, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जखमी झालेल्या शेतकऱ्यांना शेतीचे काम करण्यास आता त्रास सहन करावा लागेल त्यामुळे जखमी सचिन मदनकर तसेच  कृष्णा बोडणे या जखमींना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here