वाघाचा हल्ल्यात शेतकरी ठार

0
554

शिवनी :  ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगांव मुरपार येथील शेतशिवारात गेले असता एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दि. 8 अगस्त 2022 रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

 

सदर घटनेत मृतकाचे नाव दुर्योधन जयराम ठाकरे वय ४९ वर्ष  रा. शिवनी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे आहे.
मृतक दुर्योधन आपल्या मुलगा आशिष सोबत शेतात गेले असता. शेळ्या करिता चारा गोळा करण्यास शेतालगतच्या जंगल परिसरात  मुलगा आशिष झाडावर चढला होता व दुर्योधन झाडाखाली फांद्या गोळा करीत असताना अचानक वाघाने  हल्ला करून  त्यांना फरफटत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. अचानक वडीलावर वाघाने हल्ला केल्याचे बघून आशिष घाबरून गेला व त्याला काहीच सुचले नाही.
सदर घटना ही उत्तर वनपरिक्षेत्रातील असून वाघाने मृतदेह फरफळात दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत कोसंबी कक्ष क्र.१७५ मध्ये नेले असल्याचे आढळून आले.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले आहे व पुढील तपास वनविभाग करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here