Google search engine
Home Wild स्वतःच जीवन चक्र महत्वपूर्ण आणि पूर्णपणे संपवणार जगातला एकुलता एक सजीव म्हणजेच...

स्वतःच जीवन चक्र महत्वपूर्ण आणि पूर्णपणे संपवणार जगातला एकुलता एक सजीव म्हणजेच वनस्पती (झाड)

0
339

जीवन जगात असतांना आपलं जीवन चक्राचं महत्व प्रचंड असते त्याची गणिमा गांभीर्याने जर आजच्या पिढीनी आत्मसात केली नाही तर समोरचं भविष्य खूप भयानक असणार आहे. खरं तर वर्तमान काळातील वातावरणातील बदल बघता ही वस्तुस्थिती बोलायला जितकी सोपी वाटते तेवढीच गांभीर्याने विचार मंथन करणे गरजेचे आहे.

जस की भूतकलमध्ये जाऊन जर विचार केला तर बारमाही ठरलेलं ऋतू त्यांच्या ठराविक कालावधीत यायचे म्हणजेच चार महिन्यांचा कालखंड असायचा प्रत्येक ऋतूला हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा यात क्वचितच एखाद्या वर्षी किरकोळ फरक पडायचा म्हणजे तो नासल्यातच वर्गीकरनात असायचा परंतु या सगळ्या घडामोडीचा शेतकऱ्यांचा शेतीच्या पिकाला धक्का सुद्धा नाही असायचा याच कारणाने भूतकाळातील शेतकरी अशिक्षित असून सुद्धा सक्षमपणे शेती करायचा जर शेतकऱ्यांचा आत्महत्येचा एकदा बघितलं हल्लीच्या काळात कितीतरी पटीने जास्त आहे .
त्यावेळी नैसर्गिक आणि आधुनिक रित्या शेतकरी शेती करायचे स्वतः तयार केलेल्या यंत्राच्या साहाय्याने शेती करायचे यातून सांगायचे झाले तर त्यावेळी पर्यावरण संतुलण मर्यादित असल्यामुळे शक्य झाले शिवाय मानव पण त्या काळात निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी ज्या ज्या उपाययोजना असतील त्या वेळी ते करायचे.
परंतु आताचा स्वतःला सुशिक्षित म्हणून  घेणारा मानव निसर्गच आणि पर्यावरणाच संतुलन टिकवून ठेवण्यास अपयशी ठरला आहे शिवाय पर्यावणाराचा खुनी किंवा दोषी ठरला आहे.


मानवाने एकविसाव्या शतकात नवीन नविन यंत्रणेचा ,प्लास्टिकचा, शेतीची लोखंडी इंजिन वर चालणारी उपकरणे, वृक्षतोडी, वन्य प्राण्यांची शिकार करून खाणे अशा अनेक विविध प्रकारच्या वापर करून नैसर्गिक दृष्टीने अतिशय नुकसान करीत आहोत तसेच विविध प्रकारचे शेतात तयार होणारे खत न वापरता औषधी प्रमाणित महाग वापरून जमिनीची सुपीकता विनाशाकडे नेत आहोत त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या शहरात देखिल हजारो झाडांची कत्तल करून त्या जागेवर देखण्या इमारती उभारल्या जात आहेत हे खूप मोठं कारण आहे जीवनसत्त्वे असंतुलित होण्याचं
या जगात दोनच गोष्टीमुळे आपण कदाचित जगतो आहोत एक म्हणजे वन्यजीव व पशुपक्षी आणि दुसरं म्हणजे झाड !

वन्यजीव व पशुपक्षी
खरं तर मानवाला लज्जित होण्यासारखी उपमा वन्यजीव आणि पशूपक्ष्यांना मिळाली आहे ती म्हणजे माणसापेक्षा उत्तम प्रकारे वृक्षारोपण कोणी करीत असेल तर ते म्हणजे  वन्यजीव आणि पशुच हे मानवाला आश्चर्य वाटतं पण सत्य आहे हे आपल्या विष्टेतुन वृक्षारोपण करतात आणि तिथे झाडांची गरज असते तिथेच ते विष्टा करतात . त्यात आधुनिक युगातील मानवाच्या जिभेला लागलेली चवीमुळे वन्यजीवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे काही जीव तर अलिप्त होण्याच्या मार्गावर आहेत शासन करोडो रुपये खर्च करूनही शिकारीला आटोक्यात आणण्यासाठी अपयशी ठरतायेत त्यातल्या त्यात वनविभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. काही भागात तर शासनाने लोकांना वनांची कत्तल करून चक्क पट्टे वितरित केले आहे . परंतु पक्षीचा तर मोलाचा वाटा आहे.

पक्षी ऋतू नुसार सात समुद्राच्या बाहेर जाऊन देखील वृक्षारोपण करतात याचच छोटस उदाहरण म्हणजे रणकेली विदर्भात गडाचीरोली च्या जंगलात होती आता मध्यंतरीच्या काळात ताडोबाच्या जंगलात सुध्दा त्यांचं अस्तित्व दिसून आले आहे . पक्षी जंगलातील प्रत्येक फळ खातात आणि खाल्यावर बियांची शरीरात उपचारजनक आणि रोपटं वर या पद्धतीच बियाणे जंगलातील मोकळ्या जागेत विष्टेवते टाकतात .
भारतातील जंगलांपैकी बहुतेक जंगल हे मिश्रित स्वरूपाची आहेत यात पक्षी आणि वन्यजीव यांचा मैलाचा वाटा आहे हे दिसूनच येत नाही तर हे पक्क आहे सध्याच्या काळात पक्षी आणि वृक्ष हेच दोघे निसर्गाचं आणि पर्यावरण संतुलित ठेवण्यात मग्न असल्याचं दिसून येते आहे.
अबोल पशु , पक्षी , वन्यजीव आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे झाड हे निसर्गाचे घटक पर्यावरणाचं संतुलन सुरळीत टिकवून ठेवण्यासाठी कष्ट करत आहेत मानवाने देखील मदतीचा हात म्हणून किंव्हा आपण काही देणे लागतो या निसर्गाचे या नात्याने संतुळणात्मक भूमिकेत असणे गरजेचे आहे.

वनस्पती ( झाड )
मातीत जन्म म्हणजेच  एक छोट्याश्या बी ला मातीत गाडलं की त्यातून काही दिवसात रोपटं उदयास येते कालांतराने त्याला छोटी पाने फुटतात हळू हळू फुले येतात मध तयार होत म्हणजेच तो आता स्वतःवर दुसऱ्याला जगावायला सक्षम झालं त्याला फांद्या फुटायला सुरुवात होते पक्षी येण्यास प्रारंभ होतो वेळीस त्याला फल देखील येतात पशु पक्षांच्या आणि वन्यप्राण्यांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पण त्याची भागीदारी होत असते त्यावर फुलपाखरे अळ्या प्रमाणे असे अनेक जीवजंतू किटके वनस्पतीला अनुसरून जगतात काही वनस्पती पारंब्याच्या साहाय्याने वृक्षारोपण सुद्धा करतात या प्रक्रियेला अनेक वर्षे होतात.  वनस्पतींची सगळ्यात उपयोगी आणि महत्त्वाचे म्हणजे जेव्हा छोटस रोपटं उदयास आल्यावर जेव्हा ते भव्य स्वरूपात येते तेव्हा महत्त्वाची भूमिका निभावून जाते म्हणजेच की , पावसाळ्यात गारपीट ,ढगफुटी आणि वादळाचा पाऊस पडतो तेव्हा तो जोरदार पाऊस स्वतःच्या अंगावर घेऊन त्याची गती क्षणात कमी किंवा मर्यादित करून जमिनीवर सोडते त्याचाच फायदा म्हणजे पाणी जोरात वाहून जाण्याऐवजी तो संथ गतीने जमिनीवर सोडून त्याची आद्रता आणि आजूबाजूच्या जमिनीची पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी मदत करते.

इतकेच नव्हे तर वनस्पती उन्हाळ्यात त्याची पाने वळतात ती वाळलेली पाने सुद्धा महत्त्वाचे असते ती जमिनीवर पडून उन्हाळ्यातील अत्यंत उष्ण तापमानापासून आणि ओझोन वायूच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत असते. तसेच ते जमिनीवर चंदरे सारखे झाकलेल्या अवस्थेत काही काळ राहून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
कालांतराने ती पाने साधण्यासाठी योग्य होते त्यावेळी ती पुर्णपणे सडल्यावर कृत्रिम खताच्या स्वरूपात तयार होते आणि ते पुन्हा एकदा जमिनीत मिसळून जमिनीला शेतीसाठी अनुकूल परिस्थिती आणण्यास मदतनीस असते .वर्तमान काळात सध्या थोडी फार आटोक्यात असलेली संतुलनाची परिस्थिती लक्षात घेऊन ती योग्य प्रकारे टिकवून कशी ठेवता येईल किंव्हा त्यापेक्षा अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करणे अत्यंत आवश्यक आहे.
याचा सारांश सांगायचं झालं तर वनस्पती अगदी मातीतून उदयास आल्यापासून तर पुन्हा खताच्या रुपात मातीत परत येण्यापर्यंतचा हा वनस्पतीचा प्रवास त्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षण हा नैसर्गिकरित्या पर्यावरण संरक्षण आणि त्याच संतुलन टिकविण्यासाठी मोलाचा वाटा आहे.

लेखक
डॉ.श्रीपाद श्रीकृष्ण बाकरे
जिल्हाप्रमुख
प्रसिद्धी व छायांकन अ. भा. ग्रा. पत्रकार संघ

नागपूर विभाग उपाध्यक्ष
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था

(महाराष्ट्र राज्य)         
सर्प अभ्यासक व पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here