
नागपुर :
बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील आमघाट वनपरिक्षेत्रात आमघाट उप वनक्षेत्रातील आमघाट 1 नियतक्षेत्रातील वनक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृत्यूची घटना दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास उघडकीस आली.
मौजा आमघाट येथील गुराखी जंगलांमध्ये वाघाचा बछड्याचा मृत्यू झाल्याची बातमी आमघाट वनपरिक्षेत्राचे क्षेत्रसहायक जनवार यांना दिली.
त्यानंतर तात्काळ वनविभागाची चमु घटनास्थळी पोहोचून एन. जी. चांदेकर सहायक वनसंरक्षक (जंकास 2), उमरेड यांचे समक्ष मोका पंचनामा नोंदविण्यात आला व दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी सकाळच्या सुमारास NTCA च्या आधारभूत प्रक्रिया (SOP) नुसार निरीक्षण चमु तयार करून घटनास्थळाची पाहणी केली.
तसेच अतिरिक्त पथक तयार करून घटनास्थळा सभोवतील जंगल परिसरातील तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान व कॅमेरा ट्रक फोटोग्राफ्सनुसार सदर परिसरात नर वाघ वाघीण दोन बछड्यासह असल्याचे दिसून आले.
NTCA च्या SOP नुसार निरीक्षण चमु मध्ये डॉ. भगत सिंह हाड़ा, उप वनसंरक्षक, नागपुर वनविभाग, नागपुर, NTCA चे प्रतिनिधी अजिंक्य भटकर, PCCF (wildlife) चे प्रतिनिधी अविनाश लोढ़े, अभिजीत वायकोस, परिविक्षाधीन IFS, एन. जी. चांदेकर सहायक वनसंरक्षक (जंकास 2), उमरेड उपस्थित होते.
प्राप्त माहितीनुसार 10-12 महिने वय असलेला वाघाचा बछड्याचे सर्व वय शाबूत होते आणि वाघाच्या बछड्याचे मानेची हड्डी तुटलेली दिसून येत आहे.
त्यामुळे सदर वाघाच्या वाघाच्या 8-10 दिवसापूर्वी इतर वन्य प्राण्यांच्या भांडणात मृत्यू झाला असावा, अशी शक्यता शवविच्छेदन करताना पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वर्तविण्यात येत आहे.
शवविच्छेदन NTCA च्या SOP नुसार तीन पशुवैद्यकीय अधिकारी त्यात डॉ. बिलाल सय्यद, डॉ. खान व डॉ.समर्थ यांनी शवविच्छेदन केले.
