
(सतत दोन दिवसात दुसरी घटना)
यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी);
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर आज दि. ०९ सप्टेंबर २०२२ रोज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कळमटोला येथील कृष्णा महागु ढोळ वय (६५) वर्ष यांच्यावर अचानक वाघाने हल्ला करून ठार केले.
कृष्णा महागु ढोणे हा इसम शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्र 415/p येथे गेले असता वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला करून काही अंतरावर ओढत नेले. त्यामध्ये कळमटोला येथील कृष्णा महागु ढोणे जागीच ठार झाला .
सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे व ठार झालेल्या ढोणे परिवाराच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत वन विभागाने करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पुढील तपास वनविभाग करीत आहे.
