ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा मध्ये “पक्षी सप्ताह” निमित्त पक्षी निरिक्षण कार्यक्रम संपन्न

0
754

5 ते 12 नोव्हेंबर या आठवड्यात पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. जेनेकरून सर्वसामान्यांमध्ये पक्षांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारी निर्णय जाहीर करून पक्षी सप्ताहाची घोषणा करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले आहेत. त्याच अनुसंघाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोअर) चंद्रपुर, विभागातील मोहर्ली (वन्यजीव) वनपरिक्षेत्रात 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर “पक्षी सप्ताह” निमित्त पक्षी निरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनाक 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 6.30 ते 9.30 वाजेपर्यंत करण्यात आले. पक्षी निरिक्षण करतांना 30 – 35 प्रकारचे प्रजाती पक्षी निरिक्षणात आढळले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नंदकिशोर काळे उपसंचालक ( कोअर) यांनी केले. पक्षी निरिक्षण पाच गटातून करण्यात आले. प्रत्येक गटात पक्षी संस्था सभासद, पर्यटन मार्गदर्शक, स्थानिक, निसर्ग अभ्यासक, वनअधिकारी – कर्मचारी यांनी महालगांव तलाव, तेलीया तलाव, फुटकीबोडी,जामुनझोरा पाणवठ्यांची, खाजगी तलाव येथील प्रत्यक्षदर्शीं पक्ष्यांची स्थानिक व शास्त्रीय नांवे – अधिवास अशी वेगवेगळी माहिती आदानप्रदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here