Google search engine
Home Tourism ताडोबात पक्षी सप्ताहानिमित्त कोळसा परिक्षेत्रात ५७ पक्षी प्रजातींची नोंद; निसर्गप्रेमींचा उत्साह ओसंडून...

ताडोबात पक्षी सप्ताहानिमित्त कोळसा परिक्षेत्रात ५७ पक्षी प्रजातींची नोंद; निसर्गप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहिला! 

0
264

चंद्रपूर : पक्षी सप्ताहानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांमध्ये आज दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी सातव्या दिवशी ताडोबा येथील कोळसा परिक्षेत्रात पक्षीनिरीक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कोळसा कुरण व सभोवतालच्या परिसरात आयोजित या उपक्रमात सकाळच्या स्वच्छ वातावरणात विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. या मोहिमेदरम्यान तब्बल ५७ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली, ज्यामध्ये जलपक्षी, कीटकभक्षी, व फांद्यांवर वावरणाऱ्या रंगीबेरंगी पक्ष्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी वन कर्मचारी, बर्ड मेन सुमेथ वाघमारे, तसेच स्थानिक पक्षीमित्र ‘विंग्स ऑफ ताडोबा चे मोहम्मद सुलेमान बेग, अजय पोद्दार, ऍड. आसिफ शेख, विपुल ढवळे, प्राध्यापक इमान खान, रोशन धोतरे, आशिष त्रिपुरवार आदी उपस्थित होते.

या उपक्रमात झरी व पांगडी गेट येथील पर्यटन मार्गदर्शक, जिप्सी चालक तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही उत्साहाने सहभाग घेतला, ज्यामुळे पक्षीनिरीक्षणाचा हा कार्यक्रम एक सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रम ठरला.

पक्षी सप्ताह साजरा करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे निसर्गातील जैवविविधतेचे महत्त्व जनमानसात पोहोचवणे आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे. ताडोबाच्या कोर क्षेत्रातील या पक्षीनिरीक्षण कार्यक्रमामुळे निसर्गप्रेमी व तरुणांना पक्ष्यांविषयी अभ्यासाची प्रेरणा मिळाली असून, अशा उपक्रमांमुळे स्थानिक समुदाय आणि वन विभाग यांच्यात सशक्त सहकार्याचे नवे उदाहरण निर्माण झाले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here