वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

0
781

नागभीड..

शेतात काम करत असलेला शेतकरी वाघाचा हल्ल्यात ठार.

नागभीड तालुक्यातील मेंढा (किरिमिटी) भगवानपूर बिटातील कक्ष क्र. 860 ब्रह्मपुरी क्षेत्र उत्तर ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात   आज दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी  आपल्या परिवारासोबत जंगला लगत असलेल्या शेतात  काम करत असलेल्या एका  शेतकरी वर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटनेत मृतकाचे नाव  विलास विठोबा रंधये (42) असे आहे असून ही घटना परिवारातील मुलगा ,सून आणि पत्नी यांच्या समक्ष घडली.
सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळतात वन विभागाचे चमू घटनास्थळी दाखल झाले व मोका पंचनामा करून पुढील तपास वनविभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here