वनविभागाच्या गस्ती दरम्यान एक वयस्क वाघ मृत अवस्थेत आढळला

0
683

चंद्रपूर (यश कायरकर) :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी रेंज मध्ये एक वयस्कर वाघाचे  नैसर्गिक मृत्यू वासेरा महसूलचा गट क्रमांक १८५ मध्ये दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी उधडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार वनविभागाच्या गस्ती दरम्यान ठाकरे वनरक्षक यांना वाघ मृत अवस्थेत आढळून आला. मृत वाघाचे शरीराचे संपूर्ण अवयव साबूत असल्याचे निर्देशनात आले आहे.
सदर घटना ही 8 ते 10 दिवसा पूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे. सदर वाघ हा 12 ते 14 वर्षे वयोगटाचा असून त्याचे नैसर्गिक मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येते. सदर घटनेचे माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळचात मौका पंचनामा केला व मृत वाघांचा शवविच्छेदन करून देहन करण्यात आले.
यावेळेस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, NTCA चे प्रतिनिधी, PCCF चे प्रतिनिधी मुकेश भांदकर, वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कोडसेलवार, पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही डॉ.सुरपाम यांनी मृत वाघाचे घटनास्थळी दहन केले वनविभागाने मृत वाघाचा नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली व पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here