वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0
670

गढ़चिरोली : गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवनी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 9 डिसेंबर 2022 रोजी सकाळी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

4 डिसेंबर रोजी आंबेशिवणी येथे सोनी जितेंद्र उंदिरवाडे (24) वर्षीय महिलेवर शेतात काम करत असताना अचानक झुडपातून वाघाने  तिच्यावर हल्ला करून जखमी केले होते.
सदर हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला गडचिरोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर ५ दिवसांनंतर त्यांचा मृत्यू  झाला.

गडचिरोली तालुक्यात मानव वन्यजीव  संघर्ष वाढला असल्याने नागरिकांना मध्ये  भीती  निर्माण झाली आहे. या गंभीर विषयावर वन विभागाने विचार करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here