हत्तीच्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी

0
325

गडचिरोली : मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात हत्तीचा कळप बस्तान मांडून आहे. घाटी गावालगत कुरखेडा वैरागड चा मुख्य मार्गावरून 100 ते 200 मीटर अंतरावरील जंगल परिसरात हत्तीने एका इसमावर हल्ला करून गंभीर जखमी केले असल्याचे घटना आज दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी उघडकीस आली.
सदर घटनेत गंभीर जखमी असलेले ज्ञानेश्वर शामराव गहाणे वय 45 वर्ष असून राहणार कुंबीटोला असे आहे.
बरेच दिवसापासून जंगल परिसरात हत्तीने बस्तान मांडून असल्याने जंगलालगतचा अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. अशा वेळेस ज्ञानेश्वर गहाणे जंगलात गेले असता हत्तीच्या कडे पाणी अचानक हल्ला केला ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाला असून हत्तीने पाय मोडले असल्याचे सूत्राद्वारे म्हटले जात आहेत.
सदर घटनेत जखमी ज्ञानेश्वरला तात्काळ उपचारासाठी कुरखेडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते शरीरावर गंभीर जखमा असल्यामुळे त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.
सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळतात वन विभागाचे टीम घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला.
पुढील तपास वनविभाग करीत आहे.
गावालगत हत्तीचा कळप असल्याची माहिती ग्रामस्थांना वनविभाग तर्फ़े देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here