वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार

0
488

सिंदेवाही –

सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना दिनांक 19 सेप्टेंबर 2021 रविवार रोज दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मृतकाचे नाव अनिल सोनुले (वय ३६ ) असे आहे.

खांडला गाव परिसरातील पळसगाव ( पिपर्डा) बफर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात शेतकरी अनिल सोनुले स्वतःचे जनावरे चराईला घेऊन गेले असता जवळच दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले.
सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला.
वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गाव परिसरात वाघाची दहशत असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here