नागपूर मार्गावरील बुट्टीबोरीत वाघाचे अवयव विक्री करताना अटक

0
505

बल्लारपूर :

गोंडपिपरी तालुक्यातील कोठारी वन क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पाँचगाव नियत क्षेत्रात पट्टेदार वाघाची शिकार करून अवयव विक्री करीत असताना नागपूर मार्गावरील बुट्टीबोरी येथे मुद्देमालासह आरोपींना दिनांक 29 ऑगस्ट रविवार रोज रात्री च्या सुमारास अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील पाचगाव वनक्षेत्र वन हक्क दावे अंतर्गत वनसंवर्धन करण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाला इतर पारंपारिक वननिवासी म्हणून वन समितीला हस्तांतरण करण्यात आले  येथील काही वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचे अव्ययांची विक्री करत असल्याची बाब उघडकीस आली आहे
महादेव आळकू टेकाम हा पाचगाव येथील रहिवासी असून तो वाघाचे अव्यय विक्रीसाठी जात असताना बुट्टी बोरी वनक्षेत्राचे वन क्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठोकड यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
तपास अधिकारी एल. व्ही. ठोकड यांच्या समवेत कोठारी चे वनक्षेत्र अधिकारी संदीप लंडगे, राजुरा फिरते पथक चे अधिकारी विनायक नरखेडकर व बल्लारपूर फिरते पथकाचे अधिकारी गादेवार आणि वन कर्मचारी आरोपींच्या गावी झडती घेतली असता शिकारीचे अवजारे आढळून आले त्यासोबत मुख्य आरोपी महादेव अडकु टेकाम वय 50 वर्ष, विजय लक्ष्मण आलाम वय 45 वर्ष, रामचंद्र नागो आलाम वय 55 वर्ष, यांना ताब्यात घेण्यात आले पुढील तपासासाठी बुटीबोरी वनक्षेत्राकडे रवाना करण्यात आले आहेत यातील चौथा आरोपी लकव्याने पीडित असल्यामुळे त्याच मुभा देण्यात आली असल्याची माहिती सूत्राद्वारे दिली आहेत पुढील तपास बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here