पाथरी येथील वनपालाला एक लाखाची लाच घेताना रंगेहात अटक

0
790

सागवान लाकडाच्या वाहतुक करण्याकरिता लागणारा ठेकेदाराचा निर्गत परवाना म्हणजे TP देण्यासाठी वनपालाने तक्रारदाराला एक लाख दोन हजारांची लाच मागितले असता काही तडजोडीअंती शेवटी 1 लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते, वनपाल यांना घरी पैसे घेतांना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार हे सिंदेवाही तालुक्यातील मौजा गुंजेवाही येथील रहिवासी आहे. गावातील शेतकऱ्याच्या शेतात कटिंग केलेले सागवान लाकूड वाहतूक करण्यासाठी TP ची गरज असल्याने उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल वासुदेव लहानुजी कोडापे यांचेकडे अर्ज केला, मात्र कोडापे यांनी तक्रारदाराला TP देण्यासाठी 1 लाख 2 हजार रुपये द्यावा लागेल असे ते म्हणालेअन्यथा TP मिळणार नाही. तडजोडीअंती 1 लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी सम्पर्क साधला व त्यांना तक्रार दिली. सदर प्रकरणाची पडताळणी करून लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी 3 जून 2022 रोजी आपल्या स्टाफ सह सापळा रचला. तक्रारदाराला वनपाल कोडापे यांनी पैसे घेऊन घरी बोलावले, शासकीय निवास स्थानी वनपाल 1 लाख रुपये स्वतः घेत असताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने कोडापे यांना रंगेहात अटक करण्यात आली व  पुढील तपास सुरू आहे.
यावेळेस पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, रमेश दुपारे, नरेश नन्नावरे, रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यांनी यशस्वी पणे पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here