वाघाने केले बैलाला ठार

0
313

सिरोंचा :

दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी गाव शेतशिवारात जवळील जंगल परिसरात चराई करत असलेला बैलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना तूमनूर चेक जंगल परिसरात घडली.
प्राप्‍त माहितीनुसार सिरोंचा मुख्यालय पासून 12 किलोमीटर अंतरावरील तो मनोर येथील बैल जंगल परिसरात चराई करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले व मृत बैलाला 15 मीटर ओळत वाघाने नेले.
सदर घटनेची माहिती सिरोंचा वनविभागाला होताच सिरोंचा पोलीस, वनविभागाचे कर्मचारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून मोका पंचनामा केला.
यावेळेस वनपाल एल.एम. शेख, बीट वनरक्षक आर. एल. आत्राम, वनरक्षक आर. वाय. तलांडी, पशुवैद्यकीय अधिकारी बांबोळे, पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे, पोलीस पाटील सडवली वेमुला आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here