कमलापूर हत्ती कॅम्प मधील हत्तीचे स्थानांतरन थांबवण्याकरिता जिल्ह्यातील सर्व सामाजिक व वन्यजीव संस्था व सर्व पक्षा तर्फे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्रीना निवेदन

0
288

गडचिरोली :-  गडचिरोली जिल्हा हा अति दुर्गम जंगल व्याप्त असून उद्योग विरहित आहे या जिल्ह्यात नैसर्गिक वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात असून पर्यटनाला भरपूर वाव आहे. या जिल्ह्यात भामरागड  तालुक्यात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे दांपत्याने हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास मंत्रमुग्ध केले या जिल्ह्यात कमलापूर या ठिकाणी एकमेव हत्ती कॅम्प असून १३ हत्ती आहेत या हत्तींना नैसर्गिक अधिवासातुन गुजरात येथील जामनगर जिल्ह्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड द्वारे स्थापन केलेल्या ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अंड रिहाबिलिटेशन किंगडम या बंदिस्त ठिकाणी पाठवणार असून हत्तीच्या आरोग्याचा हवाला देऊन या हत्तींना गुजरात मध्ये नेण्याचा सरकारचा डाव आहे. हत्ती कॅम्पला बघायला दुरून पर्यटक येत असल्याने बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या हत्ती कॅम्पचे  अस्तित्व कायम ठेवावे अशी जिल्ह्यातील सर्व  नागरिकांची मागणी आहे.

या संदर्भात दिनांक १४ जानेवारी २०२२ शुक्रवार रोज मा. जिल्हाधिकारी व मा. मानकर साहेब मुख्य वनरक्षक भा.प्र.से. वनविभाग, गडचिरोली यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी, युवारंग क्लब आरमोरी, छत्रपती शिवाजी क्लब वडसा, युवा संकल्प गडचिरोली, शिव प्रतिष्ठाण आरमोरी, प्रहार जनशक्ती पक्ष आरमोरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरमोरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आरमोरी,शिवसेना पक्ष आरमोरी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आरमोरी,  व राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, आरमोरी तर्फे  निवेदन देण्यात आले. याद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील कामालापूर येथील हत्ती कॅम्प मधील  हत्तीचे स्थानांतरण थांबवण्यात यावे, अन्यथा या विरोधात सर्व सामाजिक व वन्यजीव संघटना, व सर्व पक्षिय आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला .

यावेळेस वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था, आरमोरीचे अध्यक्ष मा. देवानंद दुमाने ,युवारंग क्लबचे अध्यक्ष मा. राहुल  जुआरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे मा.निखिलभाऊ धार्मिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष  रणजितभाऊ बनकर, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था, आरमोरीचे सचिव दीपक  सोनकुसरे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here