चिमूर वनपरिक्षेत्रात जखमी वाघाचा संचार

0
593

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगत असलेल्या चिमूर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्रात एक वाघ जखमी अवस्थेत असल्याचे निर्देशनात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार मागील तीन दिवसापासून जखमी वाघ परिसरात फिरत असून त्याचा डोळा व कानाजवळ जखम असल्याचे ट्रॅप कॅमेरा आढळून आले असल्याची माहिती आहे.
मागील तीन दिवसापासून चिमूर, खडसंगी व झरी बिटात जखमी वाघ फिरत असल्याचे काही लोकांचा निर्देशनात आले आहे व तो खडसंगी प्रादेशिक व बफर क्षेत्रात फिरत आहे.
वनविभागाच्या मते दोन वाघाचा झुंजीत जखमी झाले असून त्याचा पायाला देखील जखम असल्याची माहिती पुढे येत आहे.
वनविभागाने जखमी वाघाचा उपचार लवकरात लवकर करावा असे परिसरातील वन्यजीव प्रेमीची हाक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here