सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मांदुळ प्रजातीच्या सापांसह 7 आरोपींवर कारवाई; सर्वांना न्यायालयाने पाठवले कारागृहात

0
210

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्र व रत्नापूर नियतक्षेत्रात वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत अनुसूची-1 मधील संरक्षित मांदुळ प्रजातीचे साप जप्त केले असून एकूण 7 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी कु. अंजली सायंकार (बोरावार) यांच्या नेतृत्वाखाली गस्त सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी

अशोक धोडुजी आत्राम (वय 59, रा. रत्नापूर, ता. सिंदेवाही)

ईश्वर दुर्याधन शेंडे (वय 53, रा. धामनगाव चक, ता. नागभीड)

निर्मल अनिल हालदार (वय 60, रा. नेताजीनगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली)

सरोज शिबु मालो (वय 38, रा. सुंदरनगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली)

अनिल गोविंदा मेश्राम (वय 39, रा. रत्नापूर, ता. सिंदेवाही)

विजय गणू ढोलणे (वय 53, रा. पेंढरी, ता. सिंदेवाही)

यांच्याकडे मांदुळ प्रजातीचे साप असल्याची खात्री झाली. पुढील तपासात आरोपी हिवराज उर्फ युवराज शामराव गहाणे (वय 47, रा. रत्नापूर) यांच्या घरी प्लास्टिक पिशवीत मांदुळ साप आढळून आला.

या प्रकरणी वनगुन्हा क्र. 09112/227794 दिनांक 10.02.2026 अन्वये सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

न्यायालयाचा कडक निर्णय

प्रकरणाची सुनावणी मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, सिंदेवाही न्यायालयात झाली. न्यायालयाने सर्व 6 आरोपींचा जामीन नामंजूर करून त्यांना मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे पाठविण्याचे आदेश दिले.

यानंतर फरार असलेला आरोपी हिवराज उर्फ युवराज गहाणे यालाही अटक करण्यात आली असून त्याचाही जामीन नामंजूर करून त्याला देखील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस.आर. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वनसंरक्षक अरविंद जे. (प्रादेशिक व वन्यजीव) आणि एम. बी. गायकवाड (तेंदू) यांच्या देखरेखीखाली पार पडली.

सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांच्या नेतृत्वाखाली अक्षय पवार, विनायक ब्राम्हणकर, गौरव रायते (परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी),आर. आर. सिडाम, नितीन गडपायले (क्षेत्र सहाय्यक),ओ. व्ही. चहांदे, एस. एम. नागरे, एस. एम. पारेकर, प्राजक्ता चौधरी, राहुल धनविजय, सचिन चौधरी, ऋषिकेश जावळे (वनरक्षक),तसेच विनोद चिकराम (RRU टीम) आणि वाहन चालक आशिष मडावी यांनी कारवाईत सहकार्य केले.

मांदुळ (Indian Sand Boa) ही अनुसूची-1 अंतर्गत संरक्षित प्रजाती असून तिची बेकायदेशीर तस्करी, विक्री किंवा ताबा ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. वन विभागाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे।

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here