
उदयास येणाऱ्या बांबू क्षेत्राचा उज्ज्वल भविष्यकाल
– वी. गिरीराज
चंद्रपूर: उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी बांबू क्षेत्रामध्ये अपार संधी उपलब्ध आहेत. या संधींचा पूर्ण लाभ घेण्यासाठी समन्वयपूर्ण आणि सहकार्यात्मक नियोजनाची आवश्यकता आहे. पर्यावरणपूरक असलेले हे क्षेत्र आगामी काळात महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आर्थिक बदल घडवू शकते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वी. गिरीराज यांनी केले.
रामबाग येथील वन विश्रांतीगृहात नुकत्याच झालेल्या ‘द बांबू असोसिएशन ऑफ चंद्रपूर’ या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. ही संघटना बांबू उद्योजक, बांबू तंत्रज्ञान डिप्लोमा धारक, बांबू शेतकरी, बांबू मित्र आणि बांबू कारागीर यांचा समावेश असलेली आहे.
गिरीराज यांनी आपल्या दीर्घ प्रशासकीय अनुभवावर आधारित विचार मांडत बांबू क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धतीने दीर्घकालीन आणि अल्पकालीन नियोजन करण्याची गरज अधोरेखित केली. महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाऊंडेशन संशोधन सर्वेक्षण, प्रशिक्षण, कारागीरस्नेही यंत्रसामग्रीची रचना, बांबू डेपो आणि यंत्र खरेदीसाठी निश्चितपणे सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू उद्योजक, कारागीर आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी आणि त्यांच्या संभाव्य उपायांवर सखोल चर्चा झाली.
बैठकीस प्रख्यात बांबू वास्तुशिल्पकार गणेश हरिमकर, तसेच द बांबू असोसिएशन ऑफ चंद्रपूर चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते:
- स्नेहल पिदूरकर – अध्यक्ष
- अनिल दहागावकर – सचिव
- किशोर गायकवाड – उपाध्यक्ष
- अभय रॉय – संयुक्त सचिव
- अजिंक्य शास्त्रकार – खजिनदार
कार्यकारी सदस्य:
- अन्नपूर्णा धुर्वे-बावनकर
- आदित्य मसाडे
- निलेश पाजारे
- सागर वर्मा
- मीनाक्षी वालके
- विशाल राठोड
- शुभम धुर्वे
या बैठकीत बांबू क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

