ताडोबात मौखिक आरोग्यासाठी मॅराथॉन — “Happy Mouth is a Happy Mind” चा संदेश देत जनजागृती

0
41

मोहर्ली (मोहम्मद सुलेमान बेग) (ता. २० एप्रिल):

जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या मोहर्ली येथे जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त मौखिक आरोग्य जनजागृतीसाठी मॅराथॉनचे आयोजन आज दि. 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास करण्यात आले. मोहर्ली रेंज ऑफिस ते आगरझरी गेट दरम्यान ही मॅराथॉन वन विभाग, जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष (सा.रु. चंद्रपूर), जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, ॲटपार व्हिजन फाऊंडेशन, नागपूर आणि तथास्तु रिसॉर्ट, मोहर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.

 

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मौखिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगणे, तसेच तंबाखू, खर्रा, गुटखा, सिगरेट यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता.

मॅराथॉनच्या प्रारंभी मौखिक आरोग्यावर आधारित माहितीपूर्ण सत्र घेण्यात आले.
डॉ. संदीप पिपरे (जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, सा.रु. चंद्रपूर), डॉ. आकाश कासटवार, डॉ. नितीन जनबंधू (ग्रा. रुग्णालय, बल्लारपूर), तसेच डॉ. सुप्रिया वाघमारे, डॉ. रोमल शेंडे आणि डॉ. दीपशिखा मुसळे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर) यांनी मौखिक आरोग्याचे महत्व, दातांची निगा, आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सर्वांनी “तंबाखू, खर्रा, बीडी व सिगारेटपासून दूर राहू” अशी शपथ घेतली. मॅराथॉनचे टॅगलाइन “Happy Mouth is a Happy Mind” हे होते.

या उपक्रमासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) ले. कुशाग्र पाठक आणि उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी येल्लू यांचे विशेष सहकार्य लाभले.

ले. कुशाग्र पाठक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ताडोबा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याघ्र प्रकल्प आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवर स्थानिक पातळीवरील तंबाखूजन्य पदार्थांचा नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे.”

उपसंचालक आनंद रेड्डी म्हणाले, “मौखिक आरोग्याच्या रक्षणासाठी स्थानिक नागरिकांनी गुटखा, खर्रा, सिगारेट यापासून दूर राहावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा.”

कार्यक्रमाला मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक एस.डी. जुमडे, पी.पी. ढाले, वनरक्षक, गेट मॅनेजर हिमांशू बागडे, जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते.

तथास्तु रिसॉर्टचे महाव्यवस्थापक जितेंद्र नोनिया, हेड शेफ राजेश यादव, शिवाजी घाटकिणे, चंदन शाहू, विजय डांगे, हेमंत, प्रफुल्ल, अक्षय, विनोद, व्यंकटेश (निसर्गवादी) व इतर कर्मचारी यांची उपस्थितीही विशेष उल्लेखनीय ठरली. मॅराथॉनमध्ये सहभागी झालेल्यांसाठी तथास्तु रिसॉर्टच्या वतीने चहा-नाश्त्याचे आयोजन आगरझरी गेट येथे करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून, उपस्थितांनी उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले. भविष्यातही अशाच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्याची मागणी सहभागी नागरिकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here