*वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू*

0
1384

तळोधी (बा.) (यश कायरकर)

तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत येनोली (माल) कक्ष क्रमांक 563 मध्ये सरपण गोळा करायला गेलेल्या इसमाला वाघाने ठार आज सकाळी ९ वाजता कोजबी (माल) येथील वासुदेव रामजी कोंडेकर (वय 55 वर्षे) हा घोडाझरी कालव्या लगत सुकलेलं सरपन जमा करायला गेला असता परिसरात वावरणाऱ्या वाघाने हमला करून वासुदेव यास ठार केले. व घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर नाल्याच्या पलीकडे जंगलात ओढून नेले.
सविस्तर , घटनास्थळी पाहतांना असे आढळून आले की, हमला करून ठार करणारा वाघ हा जवळच्या तलाव वरून पाणी पिऊन परतत असताना मृतक वासुदेव हा गोळा केलेल्या काड्यांची मोळी बांधत होता. त्याने अर्धवट मोळी बांधलेली घटनास्थळी आढळून आली. वाघाला म्रृतक वाकून असल्यामुळे कोणतातरी प्राणी असल्याचे भास होऊन त्याने हमला करून त्यास ठार केले असावे.
त्यानंतर माहिती मिळताच लगेच वन विभागाचे कर्मचारी व तळोधी पोलीस स्टेशन चे पोलीस घटनास्थळी पोहोचले . मोक्का पंचनामा करून विच्छेदन करीता नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. व परिवाराला तात्काळ मदत म्हणून वन विभागामार्फत (२०,०००/-) वीस हजार रुपये देण्यात आले. हमलावर ही वाघिणीच्या आईने नेमकी सोडलेली वाघीण असल्याचे निदर्शनास आले. तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र चे अतिरिक्त कार्यभार असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड , वन विभाग चे बाॅयोलाजीस्ट राकेश आहुजा, गोविंदपुर चे क्षेत्र सहाय्यक व्ही.जी.पिद्दुलवार, येनोली (माल)चे वनरक्षक एस. एस. गौरकर, चहांदे वन रक्षक गोविंदपुर बिट, जुमनाके मॅडम वनरक्षक सारंगड बिट, कराडे वनरक्षक कच्चेपार बिट, कुळमेथे वनरक्षक गंगासागर हेटी, येरमे वनरक्षक येनोली (कोटलापार)बिट, चौधरी वनरक्षक देवपायली बिट, परिक्षेत्रातील संपूर्ण वनरक्षक घटनास्थळी उपस्थित असून परिसरात गस्त सुरू आहे. आजूबाजूच्या गावात सावधानतेची दवंडी देण्यात आलेली आहे. व घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here