चंद्रपुरात पुन्हा घराजवळ एका महिलेला बिबट्याने केले ठार

0
768

चंद्रपूर : दुर्गापूर व ऊर्जानगर परिसरात मागील काही महिन्यापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सतत सुरू आहे. त्यात अनेक नागरिकांचा जीव वाघ व बिबट यांनी घेतले असून परिसरातील 16 वर्षीय राज व  8 वर्षीय प्रतिक बावणे यांना घराजवळ बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. त्या बिबट्याला जेरबंद करण्यात बरेच आंदोलन देखील झाले व त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले होते मात्र पुन्हा त्याच परिसरात बिबट परत आला असून 1 मे  2022 रोजी दुर्गापूर वार्ड क्रमांक 3 मधील गीता मेश्राम नामक महिलेला रात्री 12 वाजता च्या सुमारास घराजवळ बिबट्याने हल्ला करून ठार केले.

वनविभागाने जो बिबट जेरबंद केले होते तो हल्ला करणारा बिबट होता कि तो दुसरा बिबट होता यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर घटनांमुळे नागरिकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर घटनेची चौकाशी दुर्गापूर पोलिस स्टेशनचे PI स्वपनिल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील गौरकर, अशोक मंजुळकर, ASI भनीराम जाधव, PC मंगेश शेंडे, मनोहर जाधव, भोजराज आडे, सुरज खाडे, किशोर वालके, ASI वडगावर इत्यादी उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here