गोरेवाडा प्राणि संग्रहालयात ली वाघिणीच्या दात गळ्यात रुतल्याने बछड्याचा मृत्यू  

0
436

नागपूर :- बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात ली वाघीणीच्या बछड्याचा जन्म दिल्या नंतर अवघ्या काही तासांनी बछड्या मृत्यू झाले असल्याची घटना उघडकीस आली. सदर  दुःखद घटनेमुळे गोरेवाडा प्राणि संग्रहालय,  प्रशासनात आणि वन्यप्रेमी हळहळ व्यक्त करत आहे.

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात ली वाघीण आणि राजकुमार वाघ यांच्याबाबत सगळ्यामध्ये प्रचंड उत्सुकता होती.  दि. 31 मे 2022 रोजी दुपारी 4.00 वाजण्य़ाच्या सुमारास वाघिणीने एका बछड्याला जन्म दिले असता सगळे आनंदीत होते.
वाघिणीने बछड्याला जन्म दिल्यानंतर  बछड्याला उचलताना स्वतः च्या आईचे दात गळ्यात रुतल्याने   बछड्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
यापूर्वी देखील याच वाघिणीने 2016 मध्ये चार बछड्यानां जन्म दिला होता पण काही वेळातच ली वाघिणीने सर्व बछड्यानां मारले होते. त्यानंतर ही दुखत घटना समोर आली आहे.

सदर घटनेच्या वेळी प्राणीसंग्रहालय संचालक एस. एस. भागवत, गोरेवाडा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धुत, पशुवैद्यकिय विद्यापिठाचे प्राणिप्रसव विभागाचे तज्ज्ञ डॉ. एम. एस. पाटील, प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. मयुर पावशे आणि डॉ. सुजित कोलंगठ, जनरल क्युरेटर दिपक सावंत, बाय़ोलॉजिस्ट शुभम छापेकर यांचेसह प्राणीसंग्रहालयाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here