ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 6 जलद बचाव पदा साठी भरती: 12 जुलै पर्यंत अर्जाची मागणी

0
172

चंद्रपुर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, उपसंचालक (बफर), चंद्रपूर यांच्या कार्यालयाने दिलेल्या जाहिरातीनुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, अंतर्गत कंत्राटी तत्वावर खालील पद करिता अर्ज दि.12/07/2023 पर्यंत मागविण्यात येत आहे, अशी माहिती कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी दिली.

Recruitment Tadoba-Andhari Tiger Reserve

पदाचे नाव : जलद बचाव गट सदस्य
पदांची संख्या : 6
मानधन : रु.१५०००/-
कालावधी : ११ महिने

पात्रता :- १) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
२) उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यू कार्य मोहिमेचा अनुभव प्रमाणपत्र (वन अधिकारी द्वारा अनुमोदित)

इतर अटी व शर्ती :-

१) वयोमर्यादा २०-३५ वर्ष (१.०७.२०२३ रोजी) वयोमयदि करिता आवश्यक दाखल्याची प्रत जोडावी.

२) किमान SSC उत्तीर्ण (आवश्यक दाखल्याची प्रत जोडावी) ३) निवड झालेल्या उमेदवारास मा. उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, यांचे आदेशान्वये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, या कार्यक्षेत्रा बाहेर, कोणत्याही ठिकाणी जलद बचाव गटाचे कार्य करावे लागेल. ४) मा. उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, मधील
जलद बचाव करिता कत्राटी पद्धतीवर असलेल्या पदा करिता आवेदन सादर करते वेळी फक्त विहित केलेले दस्तऐवज अर्जासोबत जोडावे.

५) वरील प्रमाणे दस्तऐवज सदर केल्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत स्थळ, वेळ व दिनांक दूरध्वनी द्वारे कळविण्यात येईल. मुलाखती करिता येणाऱ्या उमेदवारास कोणताही प्रवास भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही.

६) नियुक्त झालेल्या जलद बचाव गट सदस्यास १०० रू. स्टंप पेपर वर करारनामा लिहून देणे बंधनकारक राहील.

७) नियुक्त झालेल्या जलद बचाव गट सदस्यास २४ तास सेवे करिता तत्पर राहणे बंधनकारक राहील.

८) अर्ज प्राप्त करावयाचा पत्ता:- उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र, प्रकल्प, चंद्रपूर रामबाग वान्वासाहत, मुल रोड चंद्रपूर, ता. जिल्हा:- चंद्रपूर – ४४२४०१ या पत्यावर पाठवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here