
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :
ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय समोरील पटांगणात महिलां वनरक्षकांनी प्रेरणादायी वृक्षारोपणाची मोहिम राबवली. वटवृक्ष पोर्णिमेच्या निमित्ताने महिला वनरक्षकांनी वटवृक्षासह, स्थानिक आणि टिकाऊ जातींच्या (कडूनिंब, मोह, चिंच, जांभूळ, वढ इत्यादी) ५० झाडांची लागवड केली. यामुळे परिसर आणखी हिरवा, पर्यावरणस्नेही व समृद्ध होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
या वृक्षारोपणाच्या वेळेस वन विभागा तर्फे विशेष उपस्थितीत होत्या :
कु. आरती आईटलावार (मोहर्ली), कु. सुमैया सिद्धिकी (देवाडा), कु. टीना काळे, सौ. शितल चौधरी (पद्मापूर), कु. माया बुरडकर (चिचोली), संजय जुमडे (क्षेत्र सहाय्यक),वनरक्षक सुरेंद्र मंगाम (सितारामपेठ), वनरक्षक विखुल जनबंधू (मुधोली) आदि उपस्थित होते.
महिलांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपणी —
एक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रेरणेची उदाहरणे.
स्थानिक, कठिन परिस्थितीस अनुकूल वनस्पतींचा समावेश — स्थायित्वासाठी योग्य.
पावसाळा, नागरीकरण आणि ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर हरितायोजनेचे स्थानिक पातळीवर महत्त्व वाढले आहे.

वृक्षारोपणाचा प्रभाव:
वृक्षांनी माती अन्नद्रव्ये सुधारणार, जलधारणाच्या क्षमता वाढणार.
जैवविविधता आणि लघु-वन्यजीवांच्या अधिवासाचे संवर्धन.
हवेमध्ये कार्बन शोषण वाढेल, शहरी गरम वातावरणात थंडावा आणेल.
अशा उपक्रमांनी स्थानिक लोक, खास करून महिलांचा पर्यावरणसंवर्धनात सहभाग वाढवून ताजातरीन पर्यावरण-संरक्षण उपाय राबविण्याची प्रेरणा मिळते.


 
                