५ जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस

0
282

जगभरात राष्ट्रीय पक्षी दिवस दरवर्षी ५ जानेवारीला साजरा केला जातो. याची सुरुवात दोन दशकांपूर्वी झाली. पक्ष्यांबद्दलचे प्रेम आणि त्यांच्याबद्दल जागरूकता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो.

माहितीनुसार, बॉर्न फ्री यूएसए (Born Free USA) आणि एव्हियन वेल्फेअर कोलिशननेव(Avian Welfare Coalition) यांनी 2002 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
राष्ट्रीय पक्षी दिवसची सुरुवात युनायटेड स्टेट्स मध्ये झाली. अमेरिकेसह जगभरात पक्षी दिवस हा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो.
वन्य आणि पाळीव पक्षी वाचवण्याची मोहीम म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जेणेकरून पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवता येईल.
तसेच पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे व जगभरातील पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लोकांना शिक्षित करण्यासाठी एक व्यासपीठ आणि संधी प्रदान करणे आहे.
जगात असे अनेक पक्षी आहेत जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतातच अनेक पक्षी जपण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ज्यामध्ये लोकांना पक्ष्यांबाबत जागरूक केले जाते. पक्ष्यांचा उपयोग इतरांना शिकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी केला जातो. तसेच नामशेष होत चाललेल्या पक्षाच्या प्रजातीं बद्दल लोकांना जागरूक केले जाते व त्यांचे संरक्षण कसे करावे याबद्दल देखील सांगितले जाते. अशा प्रकारे हा दिवस साजरा केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here