अड्याळ वनपरिक्षेत्रात विषबाधेतून 1 बिबट व  2 कोल्हे ठार

0
770

विषबाधेतून मृत्यू झालेल्या शेळी खाल्ल्यामुळे 1 बिबट 2 कोल्हे, 3 रानकुत्रे व 1 रानमांजरेचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 5 फरवरी 2022 शनिवार रोज दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.


सदर घटना तालुक्यातील वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव निपाणी गटक्रमांकातील ही घटना आहे. वनविभागाला माहिती होतं घटनास्थळी आपल्या चमूसह दाखल झाले.
प्राप्त माहितीनुसार अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गट क्र. 740 झुडपी जंगलात पिंपळगाव निपाणी परिसरात दुपारी 1 वाजताच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत मिळताच परिसरातील संबंधित वनअधिकारी  घनश्याम ठोंबरे यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले  व तपास दरम्यान त्यांना अन्य ठिकाणी काही प्राणी मृतावस्थेत मिळाले. तब्बल 3 कि.मी. परिसर तपास केल्यानंतर 2 कोल्हे, 3 रानकुत्रे,1 रानमांजर मृतावस्थेत आढळले आहे.
लाखणीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके आपल्या चमू सोबत घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनानंतर हे स्पष्ट झाले की सर्व प्राणी विषबाधेतून झाले आहेत.
सदर घटनेत मृत बिबट हा 7 ते 8 वर्षांचा असून ती मादी होती. तसेच मृत 2 कोल्ही मादी होती तर रानकुत्रे नर होते. शवविच्छेदनानंतर त्याच परिसरात त्यांच्यावर अग्नी.दाह संस्कार करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here