अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल जागीच ठार

0
246

चंद्रपूर/ प्रतिनिधी

दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी पहाटे सकाळच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने राजुरा ते विरुर मार्गातील शिर्शि गावाजवळ वाहनाच्या धडकेत अस्वल जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली तपासणी नाका अन्नुर वर कामाकरिता जात असताना चंद्रशेखर मेडपल्लीवार या वन कर्मचारीला अस्वल मृत अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडून असल्‍याचे दिसले त्यांनी लगेच राजुरा चे वन क्षेत्रपाल विदेश कुमार गलगट यांना घटनेची माहिती दिली व लगेच माहिती मिळताच सहाय्यक श्रीनिवास कटकू, वनरक्षक वर्षा वाघ, प्रियंका जावळे आणि वनमजुर घटनास्थळी पोहोचून मोका पंचनामा केले यावरून असे सिद्ध झाले की एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वली चा मृत्यू झाला. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली व पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here