चंद्रपूर येथील रेल्वे मालगाडीच्या इंजनावर आढळले बिबट्याचे मृतदेह

0
127

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) : WCL वणी परिसरातील न्यू कोल रेल्वे साईडिंग येथील चंद्रपूर STPS येथून रेल्वे मालगाडीचे इंजन आले असता या मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचे मृतदेह आढळल्याने घुग्घूस रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

सदर घटना दि. 07 मार्च 2023 रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार रेल्वेच्या हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायरच्या झटकेने बिबट्याच्या मृत्यू झाले असल्याचा म्हटले जात आहे. तसेच या परिसरात जवळ जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच होत असतात व अनेक मानव वन्यजीव संघर्ष देखील समोर आलेले आहे.
या घटनेच्या संदर्भात घुग्घूस रेल्वे स्थानकाचे अधिकारी राजेश सिंह यांनी माध्यम प्रतिनिधीकडे घटनेचे पुष्टी केली आहे.#leopard found death on railway engin #chandrapur railway  #latest news of leopard

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here