तळोधी (बा.) वनपरीक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू

0
277

बिबट्याचा मृत्यू हृदयघाताने झाले असल्याची शक्यता व मृतदेह 30 फूट उंचीवरच्या झाडावर आढळला

जिला प्रतिनिधी (यश कायरकर): ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येत असलेल्या  तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील तळोधी नियतक्षेत्रात आज दि. 08 जानेवारी 2024 रोजी एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की तळोधी बाळापुर  वनकर्मचारी हे सकाळच्या सुमारास कॅमेरा ट्रॅपचे फोटो चेक करण्यास गेले असता परिसरात दुर्गंध आल्यामुळे त्यांनी परिसराची छान बिन केली असता त्यांना तळोधी गांगलवाडी रोडच्या लगतच महसूल विभागाचा गट क्र. 64 मध्ये एका 40 ते 45 फूट उंचीच्या बेहड्याच्या झाडावर 35 फूट उंचीवर एका फांदीवर बिबट मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
सदर घटनेची माहिती तात्काळ तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार यांना देण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी पाहणी केली व  दोराच्या साह्याने झाडावर चढून मृत बिबट्याला खाली उतरविले.
सदर मृत बिबट ही साडे तीन ते चार वर्षे वयाचा मादा बिबट असल्याचे लक्षात आले. व घटनास्थळावरून बिबट मृत झाल्याची घटना 5 ते 6 दिवसापूर्वी घडल्याचे घटना स्थळा वरील परिस्थिती नुसार लक्षात आले.

सदर परिसराची चौकशी केली असता ज्या झाडावर हा बिबट मेलेला होता त्या झाडाखाली वाघाने ओरबडल्याचे, मार्किंग केल्याचे व झाडावर थोड्या उंचावर पर्यंत वाघाच्याही पंजाचे नखांचे निशाण आढळून आले. त्यावरून वाघाने पाठलाग केल्यामुळे बिबट झाडावर घाई घाईने चढला व चढल्यानंतर हृदयघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मौका पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वनविभागाच्या ऑफिसला पाठविण्यात आले. विशेष म्हणजे तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत सतत वन्यजीव जखमी झाल्याच्या किंवा कोणत्याही वन्यजीव,वानर जखमी होणे असे निगडित घटना घडत असतात मात्र तळोधी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वनविभागाला मोठा त्रास सहन करावा लागतो.
सदर बिबटाच्या शवविच्छेदनासाठी तळोधी, नवरगाव , नागभीड या तिन्ही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे सिंदेवाही पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्याशी संपर्क केला असता त्या आजारी असल्यामुळे उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र नंतर चिमूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टरांना विचारणा करण्यात आली मात्र तेथील डॉक्टर राऊत यांनी मला ते जमणार नाही, मी येऊ शकत नाही असे म्हणून येण्यास टाळाटाळ केली. शेवटी कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचे शव हे वनविभागाच्या गाडीने ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदना करीता नेण्यात आले. त्यामुळे या परिसरात नेहमी करिता डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे याकडे शासनाने लक्ष देणे ही अत्यंत गरजेचे आहे.
झाडावरून बिबट्याचे शव उतरवणे व मौका पंचनामा यावेळेस स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, संस्थेचे सदस्य सर्पमित्र जीवेश सयाम, झेप संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, मानद वन्यजीव रक्षक ब्रह्मपुरी विवेक करंबेकर, तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, सहाय्यक वनसंरक्षक ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी एस.बी. हजारे, तळोधीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने , नेरीचे क्षेत्रसहाय्यक चंद्रशेखर रासेकर , वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवार,  वन मजूर, व स्वाब संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here