मालगाडी धडकेत पट्टेदार वाघाचा मृत्यू

0
656

मालगाडी धडकेत पट्टेदार वाघाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील गोंगली हिरडामली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान साधारणत: दीड वर्षे वयाच्या वाघाच्या बछड्याचा माल गाडी खाली येऊन मृत्यू झाला आहे.
याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. टी-14 वाघीणीच्या तीन बछड्यांपैकी हा एक आहे. वाघीण आणि तिचे दोन बछडे सुरक्षित आहे.

नागझिरातील पूर्व भागा मधून गोंदिया चंद्रपूर ही रेल्वे लाईन जाते. अभयारण्याच्या लगत असल्याने अनेक वन्यजीव या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावरत असतात. दरम्यान वाघिणीचे तीन बछडे आणि वाघिन रेल्वे रुळ ओलांडत होते.
यावेळी एका बछड्याला रेल्वेची धडक बसली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी सहा वाजेची ही घटना आहे. बल्लारशाकडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या माल गाडीने बछड्याला धडक दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here