रॅली व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाने वन्यजीव सप्ताहाची सांगता

0
78

चिचपल्ली (मूल):

चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत वन्यजीव सप्ताहानिमित्त संपूर्ण आठवडाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सांगता एक भव्य बाईक रॅली व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाने करण्यात आली.

वन्यजीव सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयातून सर्व वनाधिकारी व कर्मचारी यांनी अजयपूर, महादवाडी, आगडी, कांतापेठ, चीरोली, खालवसपेठ, उथळपेठ, नलेश्वर, दहेगाव, हळदी, चिचाळा, ताडाळा या मार्गाने प्रवास करत कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे रॅलीची सांगता केली.

महाविद्यालयातील कन्नमवार सभागृहात आयोजित समारोप कार्यक्रमात चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. एस. व्ही. महेशकर मॅडम आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. वाळके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे जंगलातील महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच श्री. संतोष कुंदोजवार यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड मॅडम, क्षेत्र सहाय्यक श्री. एम. आर. निमकर (केळझर), श्री. चौरे (चिचपल्ली), वनरक्षक श्री. सुधीर ठाकुर, श्री. अनिल नाडमवार, श्री. धुळगुंडे, कु. गेडाम, कु. ठमके, श्री. येसांबरे, कु. वासनिक, श्री. मडावी, श्री. नैताम, श्री. बावणे, श्री. गेडाम, श्री. दुपारे, कु. पाटील, सौ. गेडाम तसेच संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य व वनमजूर उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here