रानडुकरासाठी लावलेल्या जाळीत अडकून बिबट्याचा मृत्यू

0
244

बीड : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भानकवाडी शिवारात मागील काही दिवसापासून रात्रीच्या वेळी रानडुकराची धुमाकूळ होत असल्याने त्यांना रोखण्यासाठी शेताभोवती जाळी लावण्यात आली होती जेणेकरून वन्य प्राणी शेतात येऊ नये मात्र रानडुकरा ऐवजी त्या जाळीत बिबट्या अडकून दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार  रानडुकराच्या शिकारीच्या मागे असलेला बिबट जाळीत अडकून मृत्यू झाला असावा म्हटले जात आहे. तसेच या परिसरात मागील 15 दिवसात अशाच प्रकारे जाळीत अडकून 2 बिबट्याचे मृत्यू झाला आहे.
सदर घटना भानकवाडी शिवारात सकाळच्या सुमारास उघडकीस आली असता ग्रामस्थांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली माहिती मिळताच सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक सिद्धार्थ सोनवणे व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनेची पहाणी करून मौका पंचनामा करण्यात आला सतत 15 दिवसात 2 बिबट्याचे जीव गेले असल्याने वनविभागात  खळबळ उडाली आहे व पुढील तपास वनविभाग करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here