ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) मोहर्ली यांना शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

0
222

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर वनविभागाअंतर्गत मोहर्ली (प्रादेशिक) परिक्षेत्रात दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास लाल रंगाच्या गाडीने आडेगाव गावामध्ये आलेल्या इसमाने वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली यांना मोबाईल वरून शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.

सदर घटनेस वासुदेव ठाकरे रा. भद्रावती, अक्षय बंडावर रा. भद्रावती, सुबोध तिवारी रा. मांजरी हे तिघे आडेगाव गावामध्ये लाल रंगाच्या गाडीने आले होते व जंगलाच्या दिशेने आत जात असल्याने त्यावेळेस वनकर्मचाऱ्यांनी बंद परिसरात फिरण्यास मनाई असल्याने व त्यांना आगरझरी मार्गे बाहेर निघण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला जंगला बाहेर काढले म्हणून त्यांनी रात्री 10.39 वाजताच्या सुमारास संतोष थिपे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (प्रादेशिक) यांना मोबाईलवर शिवीगाळ केले.
त्याच्यावर भारतीय दंड सहितेच्या 1860 कलम, 186, 504, 507 नुसार पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे गुन्हा क्र. 0441/2023 दि. 09 ऑगस्ट 2023 रोजी अन्वये दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणात पुढील तपास कुशाग्र पाठक उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष थिपे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (प्रादेशिक) चौकशी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here