वाघाच्या हल्ल्यात सावरगाव येथील शेतकरी ठार

0
162

तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील घटना

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):

ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी मधील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नेरी नियत क्षेत्रातील बोळधा बीट मधील  सावरगाव (नेरी) येथील शेतकरी ईश्वर कुंभारे वय अंदाजे ४५ वर्षे असून तो आपल्या पत्नीसह शेतात काम करायला गेले असताच व शेत जंगलात असल्यामुळे परिसरात वावरणाऱ्या वाघाने रेवनी गट, कक्ष क्र. १ मध्ये हमला करून शेतकऱ्याला ठार केले  व जवळपास 1 कि.मी. पर्यंत ओढून नेले.
सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच तळोदी बाळापुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर , नेरी नियत क्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक रासेकर व बोळधा बीटाचे अतिरिक्त कार्यभार असलेले वनरक्षक व्ही.पी. येथे यांनी घटनास्थळ गाठून आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली असता घटनास्थळापासून 1 कि.मी. अंतरापर्यंत वाघाने ओढून नेल्याचे लक्षात आले.  तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता चिमूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.  मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत म्हणून 20,000 रुपये वन विभागामार्फत देण्यात आले.
सध्या शेतीचा व धानाचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना या परिसरात वावरताना त्यांनी काळजी घ्यावी व जंगलात जाऊ नये व जंगल परिसरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे वन विभागामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना वन विभागातर्फे सूचित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here