
बाेडधा-
दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या हळदा येथील जंगला जवळील परिसरातील कंपार्टमेंट क्र ११४५ मध्ये दबा धरून असलेला वाघाने हल्ला करून गुराख्याला जखमी केल्याची घटना आज दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
जखमी गुराख्याचे नाव माेतीराम रामदास ठाकरे (वय ६५) असे असुन त्याला उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हळदा येथील माेतीराम ठाकरे हा नेहमी प्रमाणे आपले गुरे घेऊन चराईसाठी जंगल परिसरात गेले असता जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने गुरांजवळ असलेल्या माेतीराम वर अचानक हल्ला केला. जवळच शेतात काम करत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडा ओरडा केले .आवाजामुळे वाघ येथून पळून गेला.
या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनकर्मचारी यांनी जख्मी माेतीरामला तात्काळ आरमाेरी येथील रूग्णालयात दाखल केले असुन पुढील उपचार सुरू आहेत.
