मोहली गावालगत असलेला ताडोबा विलेज रिसॉर्ट मध्ये वाघाचा शिरकाव असल्याचे आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6.00 वाजताच्या सुमारास निर्देशनात आले.
स्थानिक लोकांनी रिसोर्टच्या गेट जवळ वाघाला फिरताना बघितले. तसेच रिसॉर्टचा गेट जवळ आतील भागात वाघाचे पगमार्ग आढळून आले.
प्राप्त माहितीनुसार मागील अनेक दिवसापासून या परिसरात वाघाचा वावर आहे कधी डैम परिसरात तर कधी भांमडेली रोडवर चलताना लोकांनी बघितले आहे.
वाघ बघण्यास लोकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न वनकर्मचारी व PRT टीम चे करीत आहेत.
वन विभागाला याची माहिती मिळताच RRT टीम, PRT टीम, वनरक्षक सोयाम हे बंदोबस्तासाठी आलेले आहे.
प्राप्त माहितीनुसार वाघ काल रात्री पासून ताडोबा व्हॅली रिसोर्ट परिसरात आहे आसपासच्या परिसरात शेती असल्यामुळे जंगली डूक्कर शेतात येतात त्यांच्या शिकार करण्यास वाघ पाटलाग करता करता रिसोर्ट मध्ये आला असावा असे म्हटले जात आहे.
RRT टीम वाघाला कोणते हानि न होता रिसोर्ट परिसरातुन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.