कुंपणासाठी काठ्या तोडण्यास जंगलात गेलेल्या एका इसमाला वाघाने केले ठार

0
352

चंद्रपूर :- ब्रह्मपुरी तालुक्यातील वा. हळदा येथील एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दि. १२ जून २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सदर घटनेत मृतकाचे नाव (राजू ) राजेंद्र अर्जुन कामडे असून वय 48 वर्ष  असून .राहणार वा. हळदा असे आहे.

प्राप्त माहितीनुसार राजेंद्र  कुंपणासाठी काठ्या तोडण्यास झुडपी जंगलातील पायवाटेने जात असताना  वाघाने हल्ला करून जागेच ठार केले. अचानक वाघाचा हल्ला होताच पत्नी व मुलानी आरडा ओरड केल्याने वाघ तिथून पळून गेला.

सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला.
मृतकाच्या परिवारात त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले  असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सद्या शेतीचा हंगाम सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांना शेती करण्यासाठी  शेतात जावे लागते. सतत वाघाच्या हल्ल्यामुळे नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे व  वन विभागाने वाघाच्या बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here