तळोधी (बा.) येथे अपघातात जखमी वानराचा केला रेस्क्यू ;  ‘वन विभागाच्या व ‘स्वाब’ संस्थाच्या वतीने संयुक्त रेस्क्यू करण्यात यश

0
557

चंद्रपूर : तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत तळोदी येथे रोड अपघातात वानर  गंभीर जखमी झाल्याने त्याला  दंडलवार यांच्या ट्रॅक्टर दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये त्या जख्मी बंदराने आश्रय घेतला.  व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां वर  वारंवार हमला करत असल्यामुळे  त्याची माहिती गॅरेज मालकांनी स्वाब संस्थेचे सदस्य व सर्पमित्र जिवेश सयाम यांना दिली.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘स्वाब’ संस्थेचे सदस्यांनी वन विभागाला ही माहिती देऊन वनविभाग व स्वाब संस्था यांनी संयुक्त पणे रेस्क्यू चालवून त्या बंदराला जाळात अडकवून त्याचा रेस्क्यू केला व त्यानंतर त्याला तळोधी बाळापूर येथील ग्रामीण पशुवैद्यकीय केंद्रात  त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. व त्यानंतर वन विभागाच्या सावरगाव येथील रोपवाटिकेत त्याला केळी खाऊ घालून ठेवण्यात आले.
सदर रेस्क्यु वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाली कडनोर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक कार्तिक गरमडे, वनरक्षक एस. बी. पेंदाम,  स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य विकास बोरकर, जिवेश सयाम, महेश बोरकर, व पि.आर.टी. सदस्य यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here