ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर 150 बोरी मोहा सडवा जप्त

0
237

यश कायरकर :
नागभीड पोलिसांची मोठी कारवाही 150 लिटर मोहा दारुसहित 150 बोरी सडवा एकूण 15 लाखाचा मुद्देमाल जप्त
घोडाझरी अभयारण्य जवळ चालतो हा गोरखधंदा.
रात्र-दिवस असतात नाल्यातील रेती वर जळनार्या भट्टी, अभयारण्यातील लाकडे, वन्यजीव ,व कारिडोर धोक्यात.
तळोधी,चिमुर,नेरी,नागभीड ला होतो मोहवा दारु चा पुरवठा.
लाकडाऊन मध्ये हुमा,मांगरुड,खडकी हे होते महुआ दारू पुरवठा करन्याचे केंद्र.
परिसरात पोलीस कारवाई चे कौतुक.
नागभीड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागभीड पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात नागभीड पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुमा या गावच्या तलावजवळील शेतशिवारात चार ठिकाणी धाड टाकीत लपवून ठेवलेल्या मोहा सडव्याच्या 150 बोरी जप्त करून त्यातील सडवा नष्ट करण्यात आला….!!
पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत चार संशयितांची नावे समोर आलेली आहेत.. त्यात अतुल जयसिंग सयाम,दिवाकर उरकुडा देशमुख,मनोज नामदेव तोरे, मुखरू बाबुराव सयाम रा.सर्व हुमा यांचा समावेश आहे..!!
या कारवाहित ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात ए.पी.आय. कोरवते,पि.एस.आय. सतीश सोनेकर,पो.ह.सावसाकडे,सोनवणे,
शेडमाके,मूल्यमवार,गजानन मडावी,यांनी संयुक्तरित्या कारवाही केली..!!
नेमके ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर नागभीड पोलिसांनी केलेल्या या कामगिरी मुळे नागभीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
सदर वृत्त लिहिस्तोवर कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here