तेंदूपत्ता संकलन करण्यास गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

0
2108

 

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या बफर क्षेत्रातील सितारामपेठ येथील जयश्रीया रिसोटंच्या मागील बफर प्लांटेशन मध्ये एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटना ही आज दिनांक 14 मई 2022 रोजी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास घडली असून मृतकाचे नाव जाईबाई महादेव जेंगठे वय (66) वर्ष राहणार मोहर्ली असे आहे.
प्राप्त माहितीनुसार तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता सकाळी 7.00 वाजताच्या सुमारास सितारामपेठ येथील जयश्रीया रिसोटंच्या मागील बफर प्लांटेशन मध्ये तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या 10 महिला पैकी  जाईबाई वर वाघाने हल्ला करून जागेस ठार केले व फडकडत 10 फूट पर्यंत नेण्यात आले आहे. जवळील तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार त्या परिसरात सतत वाघाचा वावर असल्याचे म्हटले जात आहे .
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच मोहर्ली बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. मून आपल्या टीम सोबत दाखल झाले व मृतकाच्या परिवारास तातडीची मदत म्हणून 50 हजार रोख रक्कम ची मदत म्हणून मोहर्ली गट ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनीता कातकर, पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले व  मौका पंचनामा करून घटना स्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here