एकलहरे परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश

0
282

नाशिक : 
मागील काही दिवसांपासून एकलहरे जवळील गंगावाडी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्या परिसरातील नागरिकांना  सतत बिबट्याचे  दर्शन होते व परिसरातील पाळीव जनावरांवर बिबट्याचे हल्ल्याचे प्रमाण फार वाढले असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते.
सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी घटना स्थळी गाठून अरूण धनवटे यांच्या शेतात पिंजरा लावला व दि. १३ सप्टेंबर २०२३ बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाला लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यास यश मिळाले.

प्राप्त माहितीनुसार जेरबंद करण्यात आलेला बिबट हा नर असून यांचे अंदाजे वय ६ ते ७ वर्ष असल्याचे म्हटले जात आहे.
वनविभागाचे अधिकारी अनिल आहेरराव आपल्या टीम सोबत घटनास्थळी दाखल झाले व पिंजरा सुरक्षितरित्या ताब्यात घेतला.
त्या जेरबंद बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याने परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here