
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
मोहर्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत ग्राम परिस्थितिकी विकास समिती (EDC) मार्फत एकात्मता आणि क्रीडाभावना वाढविण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल आणि रस्सीखेच यांचा समावेश असून, या भव्य क्रीडा स्पर्धांमध्ये मोहर्ली, आगारझरी, अडेगाव, देवाडा, जुनोना, भामडेली, सीतारामपेठ, कोंडेगाव, मुधोली आणि टेकाडी या सर्व ग्राम परिस्थितिकी विकास समित्यांचा सहभाग राहणार आहे.
या स्पर्धांचे आयोजन 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले असून, स्थळ वनपरिक्षेत्र कार्यालय मोहर्ली, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर असेल.
या उपक्रमाचा उद्देश स्थानिक ग्राम समित्यांमधील एकोपा वाढविणे तसेच युवकांना क्रीडेमार्फत एकत्र आणून सामाजिक जाणीवा दृढ करणे हा आहे. कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ आणि स्पर्धकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: संबंधित EDC सचिव
