मोहर्ली येथे सार्ड संस्थे तर्फे पक्षी निरीक्षण

0
175

चंद्रपूर : सार्ड संस्था चंद्रपूर तर्फे पक्षी सप्ताह निमित्य पक्षी निरीक्षणाचे आयोजन मोहूर्ली तलाव येथे करण्यात आले. या निरीक्षणात जवळपास 30 प्रकारच्या पक्षांच्या नोंदी घेण्यात आल्या. *पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली आणि पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पक्षी सप्ताह निमिताने पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सार्ड संस्थेतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात येते. या वर्षी मोहर्ली तलाव येथे आयोजन करण्यात आले.यावेळी पक्षी निरीक्षणात 30 प्रकारच्या पक्षांच्या नोंदी करण्यात आल्या. पक्षी निरीक्षक म्हणून श्री महेंद्र राळे यांनी सहकार्य केले.

पक्षी निरीक्षणात आढळलेले पक्षी  हळद्या, कांस्य पंखी कमळपक्षी,पानकावळा, ढोकरी, टाकचोर, वटवाघूळ, पाणकोंबडी, ठिपकेवाला होला, लालबुड्या बुलबुल,धान तिरचिमणी, जांभळा बगळा, पारवा, रेडमुनीया, पांढऱ्या पोटाचा कोतवाल,काणूक बदक,पावशा,धीवर, सोनपाठी सुतार,टिटवी,उघड्या चोचीचा करकोचा,सातभाई,कावळा,भारद्वाज, वेडाराघू, इत्यादी पक्षांच्या नोंदी झाल्या. या पक्षी निरीक्षणात सार्ड चे भाविक येरगुडे, विलास माथणकर, प्राचार्य राजेश पेशट्टीवार, रविजी पचारे, महेंद्र राळे,संजय जावडे,सुबोध कासुलकर,प्रवीण राळे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here