ताडोबा बफर मध्ये भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन — विविध EDC समित्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

0
39

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :                   

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) अंतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्रात ग्रामपंचायतीच्या विकास समितीमार्फत विविध EDC समित्यांच्या सहभागाने भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये मोहर्ली, आगारझरी, देवाडा, जुनोना, भामडेली, सीतारामपेठ, कोंडेगाव, मुधोली आणि टेकाडी या गावांतील संघांनी उत्साहाने भाग घेतला.

या स्पर्धांमध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल आणि रस्सीखेच या पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता वनपरिक्षेत्र कार्यालय, मोहर्ली येथे करण्यात आले.


कार्यक्रमाचे उद्घाटन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) चे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष तिपे यांनी केले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मोहर्ली गावच्या सरपंच सौ. सुनिता कातकर, पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर, माजी उप सरपंच राजू ढवले, डी. के. जांभुडे, क्षेत्र सहाय्यक एस. डी. जुमडे, एस. ए. बालपाने, व्ही. एल. उगे तसेच वनरक्षक एस. मंगाम, व्ही. जनबंदू, एम. दुर्वे, रामटेके, व्ही. गोधने, मोरे, आलाम, कु. येडलावार, एस. सिद्दीकी, बुरडकर, टी. काळे, एस. वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सर्व ग्रामपंचायत विकास समित्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, महिला गाईड, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षकवर्ग, तसेच मोहर्ली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“या स्पर्धांमधील विजयी संघांना पुढील स्तरावर वन विभागीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.”

आजच्या भव्य क्रीडा स्पर्धांमध्ये खालील संघांनी विजेतेपद मिळवले —
🏆 कबड्डी स्पर्धा: मुधोली संघ – पहिला क्रमांक
🏆 रस्सीखेच स्पर्धा: भामडेली संघ – पहिला क्रमांक
🏆 व्हॉलीबॉल स्पर्धा: आगारझरी संघ – पहिला क्रमांक

या उपक्रमाद्वारे स्थानिक नागरिकांमध्ये एकात्मता, क्रीडाभावना, संघभावना आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक आणि आनंदमय होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here